Languages

   Download App

महाशिवरात्री उत्‍सव साजरा

महाशिवरात्री उत्‍सव साजरा

शिर्डी - 

श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था, शिर्डीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला असून श्री साईप्रसादालयात सुमारे ५५ हजार साईभक्तांनी शाबुदाणा खिचडीचा प्रसादरुपी लाभ घेतला.

आज पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाली. त्यानंतर सकाळी ०५.५० वाजता श्रींचे मंगलस्नान होवुन शिर्डी माझे पंढरपुर ही आरती झाली. त्यानंतर ०६.२५ श्रींच्या दर्शनास प्रारंभ झाला. दुपारी १२.०० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. सायंकाळी ०६.१५ धुपारती झाली. रात्रौ ०७.३० ते ०८.३० यावेळेत समाधी मंदिरातील स्टेजवर मंदिर पुजारी उल्हास वाळुंजकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. तसेच रात्रौ ०९.१५ वाजता श्रींचे पालखीची शिर्डी गावातुन मिरवणुक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे अधिकारी, मंदिर पुजारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते. पालखी समाधी मंदिरात परत आल्यानंतर रात्रौ १०.४५ वाजता श्रींची शेजारती करण्यात आली. तर रात्रौ १२.२५ ते रात्रौ ०१.१३ यावेळेत श्रींच्या गुरुस्थान मंदिरात संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्यांची सुविद्य पत्नी सौ. ज्योती हुलवळे यांच्या हस्ते रुद्राभिषेक पुजा करण्यात आली.

महाशिवरात्री निमित्त संस्थानच्या श्री साईप्रसादालयात सुमारे ५५ हजार साईभक्तांनी मोफत शाबुदाणा खिचडीचा प्रसादरुपी लाभ घेतला. याकरीता सुमारे ५८ पोते शाबुदाणा, ३८६५ किलो शेंगदाणे, ९७० किलो तुप व १९९८ किलो बटाटा वापरण्यात आले. तर सुमारे २५ हजार २४७ नाष्टा पाकीटांचा साईभक्तांनी लाभ घेतला. 

<!--<a href="@base_url_token/sites/all/themes/sai/img/NewsVideo/news_video.mp4" > -->

Undefined
महाशिवरात्री उत्‍सव साजरा
Saturday, March 9, 2024 - 10:45